• पन्हाळे दुर्गची कोरीव लेणी, ३५ उत्खनने झाली, अजून तेवढीच मार्क केलेली आहेत. प्रथम प्रकाशात आणली. वैदिक/जैन/बौद्धधर्माचे एकीकरण येथील अक्षोभ्यची मूर्ती अती दुर्मीळ आहे.
 • शिलाहार अपरादित्य याचा मुलगा विक्रमादित्य याचा पन्हाळे ताम्रपट शके १०६१ म्हणजे ९ डिसेंबर साडेसात किलो वजनाचा देवनागरी संस्कृत. त्यामुळे दुर्ग म्हणजे कोल्हापूरचा पन्हाळा नसून पन्हाळे काजी हा ठरला.
 • त्रैकुटक राजा मध्यसेन याचा माटवण ताम्रपट कलचुरी २८४ सन २७ फ़ेब्रु ५२३ ब्राह्मी संस्कृत यामध्ये अपरांत देशाचा उल्लेख आहे.
 • उत्तर शिलाहार राजा केशिराज (व्दितीय) शके १९२७ इ.स. १२०५ सडवली ता. दापोली शिलालेख. ५) विजयानगरचा महाराष्ट्रात सापडलेला पहिला शिलालेख ९५ ग ३३ से.मी. ग २० चा संस्कृत मराठी, रामगड, ता. मालवण शके १३४८ सप्टेंबर १४२६.
 • सातार्डा, ता. सावंतवाडी शिलालेख.
 • बदामी चालुक्य राजा विजयादित्य याचा रायगड ताम्रपट शके ६२५ का.बा.पाठक, एफ़ीग्राफ़िक इंडिका खंड १० पृ. १४ वर.
 • तेरवण तेरवाटण ताम्रपट/संस्कृतभाषा/नागरी लिपी/संपत ११८२ कल्याण चालुक्यांच्या मांडलीक मंडलेश्वर काण्वदेवराय इ.स. १२६१
 • माटवण ताम्रपट, त्रैकुटराजा विक्रमसेन कलचुरी संवत २८४ सन ४९४ ब्राह्मीलिपी भाषा संस्कृत १०) साटवली ता. लांजा ताम्रपट शके १५६१.
 • ११) आदिलशाही, बहामनी, पेशवेकालीन छोटे ३ ताम्रपट १२) शिलाहार मल्लिकार्जुन याचा ताम्रपट शके १०७३
 • जगातल्या ६० देशातील जवळपास २५०० नाणी आणि भारतातील २ हजारावर नाण्यांचा संग्रह. मोंगल आदिलशाही, बहामनी, निजामशाही, ड्च, पोर्तुगीज, माळवा, सुलतान, बंगाली, तांबे, चांदीची नाणी. विजया नगरचे होन, नांदगाव व दाभोळला मिळालेली सुवर्णाची कनिष्ठ नाणी.
 • ईस्ट इंडिया कंपनीचा कोकणशी संबंधित बॉम्बे पैसा रुपयाकिंग विल्यमचा सिल्वर बॉम्बे इश्यु १७८८ चा पैसा, रुपया, ढब्बू पैसे १९४७ पूर्वीची सर्व ब्रिटीश, नाणी, गांधिया कॉईन्स, भोज, पॅगोडा, क्षत्रय सुरती रुपया, व्हिक्टोरीया, एडवर्ड जार्ज यांची नाणी आंग्रे यांचा श्री रुपया व अधेली, दाभोळ लारी व अर्धी १८ प्रकारच्या शिवराया, इंदिर, धार, जोधपूर, म्हैसुर वगैरे.
 • मराठा कॉईन्स ग्रंथाचे लेखक यांच्या न्युमॅसमॅटीक सोसायटीच्या नाशिक म्युझियमला काही महत्वाची नाणी दिली. अनेक प्रकारचे अडकित्ते वगैरे पेशवे म्युझियम ला दिले.
 • पुण्याच्या काकासाहेब वडकेंना हजार बाटल्यांचा संग्रहच दिला.
 • ठाण्याच्या ओरीएंटल स्ट्डीला, प्रदर्शनार्थ-शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्या, ताडपत्रे, भृर्जपत्रे, वल्कले, सनदा धातुच्या व दगडी मूर्ती, छोट्या-मोठ्या तोफा, बंदुका, तलवारी, दांडपट्टे, जंबीये वगैरे मोठा संग्रह.
 • चिलखत, विटा, टेरा कोटा, वीरगळ, यज्ञ साहित्य, अश्मयुगीन हत्यारे-अवशेष, प्रभावळी, घंटा, लाकडी कोरीवकामाचे पीस, भांडी, नांण्याच्या फ्रेन्स, मेडल्स, शोपीस असे कितीतरी साहित्य दिले आहे. याशिवाय पोस्ट स्टॅप्स, फर्स्ट डे कव्हर्स, संस्थानचे जुने स्टँप पेपर्स, सिगारेट लायटर्स, मायनिंग सॅंपल्स, समुद्री अवशेष, कवड्या, शंख, प्रावाळ, शिंपले, अ‍ॅगेट्स उपरत्ने, खनिजे, पत्ते, मॅचबॉक्स, किचेन्स यांचा संग्रह.
 • अपरान्त संशोधन कार्य – प्राचीन अपरान्त इतिहास संशोधनाचे बोलके पुरावे. संग्रहाचा छंद आणि उपयोग-अशा विषयांवर महाराष्ट्रात ४०० भाषणे.

Rare sketch fromAnna Shirgaonkar's collection